Tuesday, January 19, 2021

अंगठी

अंगठी   

अंगठी हाताच्या बोटांत घालायचा दागिना आहे.पुरातन काळापासून आपल्या देशात अंगठ्या घालताची चाल आहे. पुरुष आणि स्त्रिया, दोघेही अंगठी धारण करू शकतात. सहसा अंगठ्या सोने, चांदी, प्लॅटिनम, इ. मौल्यवान धातूंच्या असतात. अंगठ्या वळ्यांसारख्या गोलाकार किंवा एका बाजूस सपाट पृष्ठभाग आणि नक्षी असलेल्या असतात. अनेकदा या सपाट पृष्ठभागावर कोंदण करून त्यात मौल्यवान खडेही बसविले जातात. अंगठीच्या पृष्ठभागावरील नक्षीमध्ये स्वतःची ओळख पटविणारी चिह्ने घालून त्याचा उपयोग मोहोर किंवा शिक्का म्हणून होत असे.


No comments:

Post a Comment